अकोट (शिवा मगर ) : अकोला शहरासह कोरोनाने जिल्हयातील तालुक्याकडे आपला पसराव सुरू केला असून पसरलेल्या कोरोनाने अखेर अकोट शहरही गाठलेच, शहरातील ७१ वर्षीय वृद्धाचा अकोला येथे केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक प्रशासनाला माहिती मिळताच रुग्ण राहत असलेल्या गोकुळ कॉलनी सील करण्यात आली आहे. सदर रुग्ण हा भाजीपाला व्यवसायाशी संबंतिध असल्याने शहरातील भाजी बाजार पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला आहे.स्थानिक
गोकुळ कॉलनी येथील ७१ वर्षीय वृद्ध आजारी होता त्याला खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांकडून पुढील उपचाराकरीता अकोला येथे जाण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी रुग्णाच्या घशातील स्त्रावाचे नमुणे घेण्यात आले. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे सदर व्यक्तीवर अकोला येथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, ही माहिती अकोट येथील प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने तहसीलदार राजेश गुरव, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, वैद्यकीय अधीक्षक स्नेहल रेड्डी, एसडीपीओ सुनील सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्यासह वैद्यकीय पथक, महसूल विभागाचे पथक व आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.काही तासात नगर परिषदच्या आरोग्य विभागाने गोकुळ कॉलीनी परीसर सिल केला.
तसेच सँनिटाइझर व फवारणी सुरु केली. आरोग्य व महसूल पथकाने कॉलनीमधील नागरिकांचा सर्वे सुरू केला आहे. त्यामध्ये नाव, गाव, वय व इतर बाबीच्या नोंदी करून घेण्यात येत आहेत.आजपर्यन्त दोन महिन्यांच्या कालावधीत अकोटला कोरोना भेदू शकला नव्हता मात्र आज रुग्ण निघाल्याने अकोटकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
4 varshat sadhe raste banau shakat nahi te log aata corona sarkhya virus sobat ladhnar,
Kontyahi sharache raste hech to zilha kasa asel te sangtat.