• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर; एकूण संख्या १७५

Media Desk by Media Desk
May 25, 2020
in Featured, कोविड १९, विदर्भ
Reading Time: 1 min read
78 1
0
चाचणी
17
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती : अमरावतीमध्ये सोमवारी दुपारपर्यंत आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून त्यात तीन महिन्याच्या मुलासह तीन वर्षांच्या मुलीचा यात समावेश आहे. दोन डॉक्टरांसह पोलीसपत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात कोरोनाची दहशत वाढत आहे. रविवारी शहराला कोरोनाने मोठा हादरा दिला होता. येथील हबीबनगर कंटेनमेंटमधील ३१ वर्षीय व्यक्ती २१ मे रोजी कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाइन करून थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला होता. त्याचा अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. यामध्ये पाच वर्षीय चिमुकली, ३० व ६५ वर्षीय महिला व ३३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त या परिवाराच्या संपकार्तील २२ व ५४ वर्षीय पुरुष व ३६ वर्षांच्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याव्यतिरिक्त २१ मे रोजी पॉझिटिव्ह अलहिलाल कॉलनीतील एका व्यक्तीच्या संपकार्तील ११ वर्षीय मुलगी तसेच शिवनगरात २१ व २२ मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या संपकार्तील शिवनगरातील ३० वर्षीय युवक व ६५ वर्षीय वृद्धाचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. या सर्वांना कोविड रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावरील कक्षात हलविले आहे. कोविड रुग्णालयातील ४५ वर्षीय परिचारिकेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोविड रुग्णालयात १० दिवसांची सेवा आटोपल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येते. या महिलेचा थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला होता. याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाल्याने कोविड रुग्णालयातील चौथा वॉरिअर संक्रमित झाला आहे.आरोग्य विभागाद्वारे या संक्रमित रुग्णांची हिस्ट्री घेण्याचे काम सुरू आहे. बाधिताच्या घराकडील मार्ग बंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या भागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार आहे. हबीबनगर परिसर यापूर्वीच कंटेनमेट जाहीर केला असल्याने आशा व एएनएम व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे गृहभेटी देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.”,

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Previous Post

श्रमिक स्पेशल ट्रेन पुन्हा एकदा रस्ता चुकली, बलियाऐवजी नागपूरला पोहोचली

Next Post

अखेर कोरोनाने अकोट गाठलेच ! प्रशासनाकडून एरिया सील करण्याची प्रक्रिया सुरू

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
akot corona news akola

अखेर कोरोनाने अकोट गाठलेच ! प्रशासनाकडून एरिया सील करण्याची प्रक्रिया सुरू

vadegaon-eid-namaj

वाडेगावात नागरीकांनी आपआपल्या घरातच केली ईद ची नमाज अदा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.