अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्हयात कोरोनाचा प्रकोप वाढला असून कोरोनाबधितांचा आकडा हा चारशेचा टप्पा पार करण्याच्या तयारीत आहे. आज पर्यंत अकोल्यात आज पर्यंत २४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. माहे मार्च प्रारंभी कोरोनाचा प्रसार जगभर पसरला मे च्या मध्यापर्यंत कोरोनाने उग्र रुप धारण केल्याने सर्वत्र हातची कामे लॉकडाऊनमुळे बंद पडली होती. मात्र चौथ्या लॉकडाऊनमध्ये जिल्हा प्रशासनाने काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यामुळे काही प्रमाणात उद्योग धंदे सुरु झाले आहेत. शासनाने परवानगी दिल्याने राज्याबाहेरील व महानगरामधील ग्रामिण भागातील नागरिक परतत असल्याने कोरोनाचा प्रवास ग्रामिण भागाकडे होत असल्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे. कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी २३ मार्च पासून देशव्यापी लॉकडाऊन शासनाने लागू केल्यामुळे महानगरात विविध कामासाठी गेलेले कामगार व मजूर अडकून पडले होते. तसेच राज्यात परराज्यातील मोठ्या प्रमाणात कामगार कुटूंबासह आले होते. परंतु लॉकडाऊनच्या काळात त्यांना त्यांच्या मुळगावी जाणे शक्य होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. वाहने बंद असल्याने अखेर अनेक कामगारांनी पायी आपला मोर्चा स्वगृही परतण्यासाठी वळविला मिळेल त्या वाहनाद्वारे तसेच सायकल, दुचाकी, तीनचाकी व इतर वाहनाने घर गाठले. यामुळे कोरोनाचा प्रसार जलद गतीने पसरण्याची भिती निर्माण झाली होती.मुंबई, पुणे, औरंगाबाद आदिसह कित्येक शहरामधून कुंटूंबियाचे लोंढे खेडेगावात, मुळगावी पोहचत असून काहींनी कोरोना व्यवस्थापन समितीचे सरपंच, पोलिस पाटील, आशा सेविका हे विनंती करुन ही तपासणी करुन न परतलेले नागरिक विलगीकरणात राहायला तयार नाहीत. तसेच होम क्वारंटाईन होण्यास सुध्दा धजावत नाही. या कारणामुळे आता कोरोनाचा धोका ग्रामिण भागात वाढणार असल्याचे गावातील नागरिक दहशतीत जगत आहे. तर खेड्यातील अनेक शेतकर्यांनी शेतात कुटूंबासह राहण्याला पसंती दिली आहे.