तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथील १०८ रुग्णवाहिचा बोलबाला नेहमीच नागरिकांना ऐकायला मिळतो कारण ती कधी सहा सहा महिने बंद अवस्थेत असते तर सुरू झाली तर रस्त्यात बंद पडते, कारण प्रशासनाला या रुग्णवाहिकेकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही.
संपूर्ण जिल्हयात कोरोनाने हाहाकार माजविला आहे अशातच तेल्हारा तालुक्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. या कोरोना काळात महत्वाची भूमिका पार पाडणारी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका जर व्यवस्थित नसेल तर कसे होणार तालुक्यातील पाच रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाकडून आता रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकरन करण्यात येत आहे अशातच संपर्कात आलेल्याना घेऊन जाण्याचे काम हे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला होते मात्र शहरातील पंचायत समिती समोर ही रुग्णवाहिका बंद पडली. प्रशासन योग्य प्रकारे लक्ष देत नसल्याने १०८ रुग्णवाहिका नेहमीच कुठे ना कुठे बंद पडते. प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून कोरोना काळात तरी रुग्णवाहिकेची डोकेदुखी बंद करावी अशी मागणी होत आहे.