तेल्हारा : जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील खरीप हंगाम, पीक कर्ज वाटप, कापूस, तूर, हरभरा खरेदी तसेच कोव्हिडं 19 या संदर्भात तहसील कार्यालय येथे आढावा घेतला असता विविध खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. तालुक्यात सुरू असलेली कापूसखरेदी बाबतीत दोन केंद्र वाढवून देण्याचा प्रस्ताव मंजुरी साठी सीसीआय कडे पाठविण्यात यावा तसेच तूर हरभरा खरेदी करीता जागेअभावी बाजार समिती च्या यार्ड मध्ये खरेदी सुरू करावी. जेणेकरून करून खरेदी चा वेग वाढेल व मुदतीच्या आता शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल.
पीककर्ज वाटपाबाबतीतही आढावा घेऊन ज्या शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला त्याना पुन्हा कर्ज वाटप लवकरात लवकर बँकांनी करावे खरीप हंगामाचे नियोजन काय केले आहे याबाबत कृषी विभागाकडून माहिती घेतली. तसेच कोव्हिडं19 बाबतीत काय उपाययोजना करण्यात येत आहेत याबाबत माहिती घेऊन रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांबाबतीत दक्ष राहून कॉरं टाईन सेन्टर ची माहिती घेऊन सदर सेन्टर अक्टिव्ह करून तिथेच स्वब घेण्यासाठी यंत्रणा सुरु करून केवळ स्वब चे नमुने पाठविण्यात यावे रुग्णांना अकोला येथे पाठविण्यात येऊ नये असे यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे, तहसीलदार राजेंद्र सुरडकर यांच्या सह विविध खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.