अकोला (प्रतिनिधी)- अकोला शहरातील वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रशासनाने दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन रस्त्यावर वाढत चाललेली वाहनांची गर्दी कमी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी ह्यांनी दुचाकीवर डबल सीट व चारचाकी वाहनांमध्ये चालका शिवाय दोन पेक्षा जास्त व्यक्ती बसविण्यास प्रतिबंध करून सोशल डिस्टन्स चे पालन व्हावे म्हणून आदेश निर्गमित केले आहेत, सदर आदेशानुसार पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांनी शहर वाहतूक शाखेला कारवाईचे आदेश दिले असून त्या प्रमाणे शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कर्मचाऱ्यासह धडक कारवाई सुरू करून डबल सीट मोटोरसायकल चालविणाऱ्या 110 व चालकांच्या मोटोरसायकली तात्पुरत्या जप्त करण्यात आल्या असून अकोला शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून जिल्हाधिकारी ह्यांनी पारित केलेल्या आदेशाचा भंग करू नये अन्यथा आपले वाहन जप्त करण्याची कारवाई शहर वाहतूक शाखेला नाईलाजाने करावी लागेल असा इशारा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला आहे