मुंबई : कोरोनाचा फटका हा सणांना देखील बसला आहे. तर येत्या गणेशोत्सवाचे स्वरूप देखील या कोरोनामुळे बदलले जाणर आहे. त्यात आता केंद्र सरकारने गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तीकारांना दिलासा दिला आहे. यंदाच्या वर्षी पीओपीच्या मूर्तीवरील बंदीला स्थगिती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली.
पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मूर्तीकारांना शाडूची माती मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मूर्ती बनवण्यासाठी पीओपीचा वापर केला तरी चालेलं असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. मात्र कोरोनामुळे या आदेशाला एक वर्ष स्थगिती देण्यात आली आहे.
गणेशोत्सव समन्वय समितीने यंदाच्या वर्षाकरिता शाडू माती ऐवजी पीओपीची मूर्ती करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली होती. गणेशोत्सव समन्वय समितीची ही मागणी केंद्रीय प्रकाश जावडेकर यांनी मान्य करत पीओपीच्या मूर्ती वरील बंदी एक वर्ष स्थगित करण्यात आली आहे.
याबाबत जावडेकर म्हणाले की, गणेशमूर्तीसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याच्या निर्णय एका वर्षासाठी स्थगित केला आहे. सध्या अनेक मूर्तिकारांच्या मूर्ती बनवून तयार आहेत. त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.