पातूर (सुनील गाडगे ) : अकोला येथील नायगाव , अकोटफैल मधील कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आलेले पातुरातील १२ जण व पातूर येथील राहिवासी अकोला येथे कार्यरत कर्मचारी अशा १३ जणांना तपासणीकरिता अकोला येथे पाठविण्यात आले होते. गुरुवारी या या सर्वे तेरा जणांचा रिपोर्ट नेगेटिव्ह आल्याची माहिती आहे. अकोला येथील नायगाव , अकोटफैल मधील कोरोनाबाधित रूग्ण ११ मे रोजी पातूर येथील एक भागात च्यांच्या सासरवाडीत आपल्या पत्नीला अकोला येथे नेण्याकरिता आला होता.
सदर रूग्णाच्या अहवाल पॉसिटीव्ह आल्यांनतर हा रुग्ण कोणाच्या संपर्कात आल्याची माहिती घेण्यात आली. तेव्हा सदर रुग्ण पातूर शहरातील एक भागात १ मे रोजी येऊन गेल्याची माहिती समोर आल्यानंतर पातुरात जायच्या गेल्या २८ दिवसापेक्षा जास्त कालावधीपासून पातुरात कोरोनाबाधित रूग्ण आढळला नाही. महसूल विभागीचे नायब तहसीलदार एहसाननोद्दीन नगरपालिका स्वचछता पर्यवेषक कल्याणी सोळंके पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोरे , ग्रामविकास अधिकारी राहुल उदरे, शहरात योद्धा म्हूणन मेहनत घेत आहे. पातूरकर सुध्दा लॉक डाउनच्या निम्याचे काटेकोर पालन करीत आहे. परंतु पातूर शहरात सध्या कोरोनच्या रुग्ण नसल्याने शहरवासीयांना दिलासा असला तरी पातूर शहरात बाहेरगाववरुन येणाऱ्यावर विशेष लक्ष ठेवणे गरजेचं आहे. याकरिता पातूर शहराच्या प्रमुख रस्तावरील नाकेबंदी कडक करण्याची गरज आहे.
शहराच्या चेकपोस्ट या शासकीय कर्मचार्च्या भरशावर सुरु असून पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गरज आहे. पातुरतील १३ जणांना तपासणीकरिता अकोला येथे पाठविण्यात आले होते. त्या सर्व १३ जणांचे अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. संपर्कात आले होते, त्या १२ जण व पातूर येथील राहिवासी अकोला येथे कार्यरत कर्मचाऱ्याला खोकला व सर्दीच्या त्रास जाणवत असल्ण्याने या सर्व १३ जणांना तपासणीकरिता अकोला येथे पाठविण्यात आले होते. या सर्वाच्या अहवालकडे पातुरवासीयांचे लक्ष लागले होते. गुरुवारी या १३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, हे सर्व १३ जणांचे अहवाल नेगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यामुळे पातुरकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या एक महिन्यात पातुरात कोणताही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्या नाही.