नवी दिल्ली : देशात कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेवर अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने आरबीआयकडून तीन महिने EMI न भरण्यास मुदत दिली होती. आता ती पुन्हा तीन महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत हप्ते न भरण्याची सवलत दिली आहे. रेपो दरातही कपात केल्याने कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून कर्जदारांना दिलासा देत तीन महिने ईएमआय भरण्यापासून सवलत दिली होती. त्यानंतर आता पुन्हा त्याला तीन महिने वाढ देण्यात येत असल्याची घोषणा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली. त्यामुळे कर्जदारांना जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने कर्जाचे हप्ते न भरण्याची सवलत मिळणार आहे.
कोरोना व्हायरस युद्धादरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पुन्हा रेपो दरात कपात केली. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘रेपो दर कमी केला जात आहे. आरबीआयने ४० बेसिस पॉईंट कमी केला आहे. आता रेपो दर चार टक्के राहिल. महागाईचा दृष्टीकोन अत्यंत अनिश्चित आहे. रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो आहे तसाच म्हणजेच ३.३५ टक्के ठेवला आहे. २०२०-२१ च्या उत्तरार्धात वित्तीय आणि प्रशासकीय उपायांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे. रेपो दर कमी झाल्यामुळे आता कर्ज आणखी स्वस्त होऊ शकेल अशी अपेक्षा आहे.
ते पुढे म्हणाले की, २०२०-२१ मध्ये जीडीपी वाढ नकारात्मक प्रदेशात होईल. सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने ५.१ ने व्याजदरामध्ये कपात करण्याच्या बाजूने मतदान केले. भारतातील मागणी घटत आहे, वीज, पेट्रोलियम उत्पादनांचा वापर कमी होत आहे, खासगी वापर कमी होत आहे. कोविड-१९ प्रादुर्भावामुळे खासगी वापराला सर्वाधिक फटका बसला आहे. गुंतवणूकीची मागणी थांबली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या दरम्यान सुस्त आर्थिक घडामोडींमुळे सरकारच्या महसुलावर वाईट परिणाम झाला आहे.
सर EMI काही कामाचा नाही आहे EMI आमच्या सुरू आहे बजाज फायनान्स ची सुरू आहे