अकोला,दि.२१ – अकोला ते खगरिया बिहार येथे ६३२ मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे आज दुपारी दोन वाजता अकोला येथून रवाना करण्यात आली. यात नागपूर येथून आणखी ९५० मजुरांना बसवण्यात येणार आहे. अकोला रेल्वेस्थानक येथून दुपारी ही रेल्वे रवाना झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार घुगे व खेडकर तसेच रेल्वेचे अन्सारी व नवले हे अधिकारी उपस्थित होते.
या रेल्वेत १५६० प्रवासी नेण्याची क्षमता होती. त्यात अकोला येथून अकोला जिल्ह्यातील ३००, बुलडाणा येथील ३३, वाशीम २७०, यवतमाळ येथील ३१ असे ६३२ जण रवाना झाले. त्यांत पुढे नागपूर येथून ९५० जण बसविण्यात येणार होते. यासर्व मजूरांचे प्रवास भाडे हे मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात आले असून त्यांना जातांना जेवणाचे पॅकेट, पाण्याची बाटली, अल्पोपहारासाठी बिस्कीट्स देण्यात आले, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रोहयो तथा नोडल अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली.
अधिक वाचा: उद्यापासून अकोला जिल्हयातील या आगारामधून धावणार लालपरी,नियमांचे करावे लागणार पालन