अकोट(देवानंद खिरकर)-आज एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात करोना सारख्या महामारीमुळे लोकांचे प्राण धोक्यात आले आहे.तरी नवीन पीक कर्जा करीता दस्तऐवज साठी शेतकरी फिरत आहे.अश्यातच बँकेकडून मूल्यांकन ( हयसीयतचा दाखला ) याची मागणी होत आहे.एकीकडे मूल्यांकन अहवाल हे काढण्याकरिता ग्रामीण भागातील शेतकरी यांना अकोट येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे यावे लागते आहे. अशा वेळी दुय्यम निबंधक कार्यालय येथील अधिकारी यांच्या कडून एक आदेश दाखवून त्यातील सूचना क्रमांक ३ मधील(क) हे ओळ वाचायला सांगितली जाते.त्या नंतर या आदेशानुसार आम्ही अर्ज स्वीकृत करणे व नकला देने बंद केले आहे . त्या ओळी खालील प्रमाणे “दस्ताची किंवा सूची ची प्रमाणित प्रत व मूल्यांकन अहवाल या साठी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करणे फी भरणे थांबवण्यात येत आहे.
पक्षकारानी या कामासाठी अर्ज करणे,फी भरणे व नकलेची उपलब्धता जाणून घेणे यासाठी आपले “आपले सरकार” सेवेचा वापर करावा. असे या आदेश क्रमांक ३ ( क ) मध्ये नमूद केले आहे.हे दाखवून शेतकऱ्यांना ते परत पाठवत आहे. एकीकडे बँकेतील अधिकारी मूल्यांकन शिवाय कर्जाचे दस्तऐवज स्विकारत नसल्या मुळे आकोट तालुकातील शेतकऱ्यांची दिशाभूल व हेलपाटे घ्यावे लागत आहे. परंतु या पत्रातील उल्लेख प्रमाण आकोट तालुक्यातील सहायक दुय्यम निबंधक कार्यालय आकोट त्यांचे वरील पैकी कोणतेही दस्तऐवज ऑनलाईन झालेले नाही.एकीकडे शासनाचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांना कर्जा करीत कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नये.आणि आज रोजी काही बँकेतील अधिकारी तसेच सहायक दुय्यम निबंधक कार्यालय आकोट येथील अधीकारी यांच्यामुळे होणाऱ्या त्रासा मध्ये आकोट उपविभागीय अधिकारी यांनी काही उपाय योजना कराव्यात जेणेकरून शेतकरी वर्गास त्रास होणार नाही.या करिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष सुरज मेघराज वर्मा,शहराध्यक्ष शशांक कासवे यांच्या नेतृत्वात शुभम देशपांडे, अजय शर्मा,संतोष भावे,तेजस लेंघे,आशिष गवई,किरण इंगळे,शाकिर खान, आदी कार्यकर्ते निवेदन देण्याकरीता हजर होते.