अकोला(प्रतिनिधी)-कोरोनामुळे लालपरीला लाल दिवा मिळाल्यामुळे बस सेवा बंद पडली होती मात्र आता पुन्हा शासनाने आगार प्रमुखांना आदेश देऊन बस सेवा सुरू करण्याचे सांगितले.
अकोला जिल्हा हा रेड झोन मध्ये असून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढती आहे.अशातच शासनाने आज आदेश काढून जिल्हयातील अकोट ,मूर्तिजापूर, तेल्हारा या आगार प्रमुखांना बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.बस सेवा सुरू करताना नियमांचे पालन करावे असे आदेश देऊन यामध्ये प्रवाशी क्षमतेपेक्षा ५०% प्रवाशी वाहतूक करणे,सोशल डिस्टटिंग,बस सॅनेटाईज करणे,चालक वाहका सहित प्रवाशांनी मास्क वापरणे,एका बाकावर एकच व्यक्ती बसणार याची दक्षता घेणे,बस सेवा ही सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यन्त करावी असे नियम ठरवून बस सेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मात्र या आगारातील बस ह्या अकोला गाठणार नाहीत हे विशेष
टी स्टोल होटल केव। चालू होणार