बोर्डी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील अकोली जहागिर गावालगत असलेल्या नंदकुमार बागडी यांच्या शेतातून इलेक्ट्रिक खांब गेलेले असुन तारांचे घर्षण होवुन झालेल्या शॉर्टसर्किट मुळे या शेतात आग लागली. मात्र अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढिल अनर्थ टळला. बागडी यांच्या शेतातिल बांबूचे झाड व बांभळीचे झाड यांच्या मधातून तार गेलेला आहे.त्यामूळे तारांचे घर्षण होवुन आग लागली.नुकत्याच झालेल्या वादळी वारा व गारपिट मुळे केळी पिकांचे नुकसान झाले होते.व आता या आगीमुळे ठिबक व झाडे जळाली. हवेच्या वेगामुळे दुसर्या बाजूला असलेल्या केळीच्या बागेत आगीने आगेकुच केली. मात्र तेवढ्यात अग्निशमन दलाच्या जवानांनि आगीवर नियंत्रण मिळवले. अन्यथा 2 हेक्टर बागेतील पिकांचे मोठे नुकसान झाले असते. या घटनेची माहीती प्रफुल्ल बागडी यांनी अकोट पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दल वेळेवर पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. आगीच्या शेतात असलेली बांबूची, बाभळीची, सागवानची, केळीची झाडे व ठीबक जळाली.