अकोला : अकोला महानगरांमध्ये covid-19 चा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग व मनपा अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे व एकवाक्यता नसल्यामुळे तसेच पोलीस विभाग एकत्र नसल्यामुळे इतर जिल्ह्याच्या तुलनेत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे .
निर्णय क्षमता कमी असणे हे एकमेव कारण आहे. केवळ नाटकबाजी व मीडिया मध्ये कसे रहावे यासाठी अधिकारीवर्ग सातत्याने कार्य करीत असल्याचा आरोप आमदार गोवर्धन शर्मा यांनी केला आहे. यामुळे अकोल्यातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त होत आहे. नागरिकांच्या संयमाची परीक्षा अधिकारी वर्गाने घेऊ नये असे आमदार गोवर्धन शर्मा यांनी सांगून राज्य शासनाने या संदर्भात लक्ष केंद्रित करावे. अकोला महानगरपालिकेला रुग्णवाहिका द्यावी यासाठी आपण 30 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले असून सातत्याने यासाठी आपण पाठपुरावा करत असताना सुद्धा अठरा दिवसानंतर जिल्हा प्रशासनावर आंदोलनाचा इशारा दिल्यावर आदेश काढावा लागला.
अकोला महानगरपालिकेत रुग्णवाहिका असली तर हॉस्पिटलला नेण्यासाठी सोय होऊ शकते. अकोला जिल्हा हॉस्पिटलमध्ये सुद्धा अधिकारी वर्गात मध्ये एकवाक्यता नसल्यामुळे रुग्णांना हेलपाटे खावे लागत असून हा प्रकार चिंताजनक आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिक सेवा प्रदान करणाऱ्या विषयी आदर भाव, त्यांच्या कार्याला नमन करत असताना काही झारीतील शुक्राचार्य असा प्रकार करून मानवामध्ये राग निर्माण करण्याचा काम करत आहे. अशा संकटाच्या काळामध्ये टीका केली म्हणजेच राजकारण समजल्या जाते परंतु संयम हे किती दिवस पाळावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार लोकप्रतिनिधी सूचना दिल्यावर सुद्धा जिल्हा प्रशासन व महानगरपालिका रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी पुढाकार घेत नाही ही दुर्दैवी बाब आहे.
अकोला शहरामध्ये रुग्णवाहिका हवी या आधी सुद्धा आपण रुग्णवाहिका शव वाहिका दिली होती परंतु तत्कालीन मनपा प्रशासनाने इतर सामाजिक संस्थेला देऊन रुग्णवाहिका गायब केली. परंतु सध्या गरज असताना जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन गेल्या आठ दिवसापासून यासंदर्भात कारवाई करत नाही ही दुर्दैवी बाब आहे. जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आरोग्य प्रशासन व मनपा प्रशासन आणि एकत्र येऊन हा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी उपाययोजना करा अकोलेकर सहकार्य करायला तयार असल्याचाही आमदार शर्मा यांनी सांगितले आहे.