वाडेगाव (राजकुमार चिंचोळकर)- बाळापूर येथील काळुबाई शेत शिवारात आग लागल्याने शेतकऱ्यांचे चार लाखांवर नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाळापूर येथील शेतकरी चंद्रशेखर वानखडे व आशिष वानखेडे यांच्या काळबाई शेतशीवारातील शेतातील गोठ्याला आग लागून कांदा पीक तसेच एकशे वीस स्पिंकलर पाईप नोझल पाईप ताडपत्री तसेच ठिबक नळ्या फवारणी स्प्रे पंप व गोठ्यातील इतर साहित्य सह गोठ्या वरची टीन पत्रे आगीत जळून भस्मसात झाले आहे.
यामध्ये सदर शेतकऱ्यांचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित शेतकऱ्यांनी बाळापुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्याची माहिती आहे, तर याच शेतशिवारात गोकुळ शक्तीवाले यांचा सहाशे पेंडी कळवा जळून खाक झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे सलग एकाच परिसरात आगीच्या दोन घटना घडल्या असल्याने एखाद्या अज्ञात व्यक्तीने हेतुपुरस्पर पणे सदर कृत्य केल्याची चर्चा परिसरात होत आहे. तर सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
अधिक वाचा: पातूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला वेबिनार, किड्स पॅरडाईज चा उपक्रम