पातूर(सुनील गाडगे)- कोरोना विषाणूच्या संकटाला थांबवण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन आहे. अशा परिस्थितीतही दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करणारे वेबिनर पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलमध्ये सुरू करण्यात आले आहेत. ऑनलाईन वेबिनर घेणारी अकोला जिल्ह्यातील किड्स पॅराडाईज पहिली शाळा ठरली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. अशातच सर्वत्र संपूर्ण जिल्हा लॉक डाउन करण्यात आला आहे. अशा परिस्थतीत पातूरच्या किड्स पॅरा डाईज ने नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कलासेस सुरू केले आहेत. सोबतच या विद्यार्थ्यांना लॉक डाउन च्या काळात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, विषयाचे नियोजन यासह विविध महत्वाच्या टिप्स देण्यासाठी वेबिनरचे आयोजन करण्यात आले. या वेबिनरची सुरुवात महाराष्ट्रातील ख्यातनाम फ्री लान्स ट्रेनर प्रा. श्रुती देसाई-राजे यांच्या वेबिनर ने झाली. शाळेचे संस्थापक गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला. यानंतर प्रा. स्वप्निल इंगोले, प्रा. प्रशांत ठाकरे, प्रा. सचिन सावदे यांचे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे ऑनलाईन वेबिनर आयोजित करण्यात आले आहेत. याबाबतचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.
अधिक वाचा: बाळापूर कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना खरीप पूर्व मार्गदर्शन