दानापूर (सुनीलकुमार धुरडे)- तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे आज दुपारी 2 वाजता भीषण आग लागली ,आग इतकी भयंकर होती की तेल्हारा येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी व गावातील लोकांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. या आगीत गुरांचे 3 ट्राल्या कुटारअंदाजे बारा हजार रु बैल बंडी अंदाजे 10 हजार रु,शेतीचे अवजारे 10 हजार रुपये , 30 टिन पत्रे, पाण्याच्या टाक्या2 , एक सायकल अंदाजे 20 हजार,अंदाजे 52 हजार यामध्ये कोणत्याही जीवित हानी नाही एकूण 55 हजार पाचशे रु चे नुकसान झाले.
दानापूर येथील कर्तव्य दक्ष तलाठी संजय साळवे, सरपंच पती प्रेमकुमार गोयनका, ग्रामपंचायत सदस्य ,तेल्हारा येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी व गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले तर काहींनी आपले स्वतःचे टँकर आणून आग विझविण्यासाठी सहकार्य केले.
अधिक वाचा: बाळापूर कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना खरीप पूर्व मार्गदर्शन