वाडेगाव (राजकुमार चिंचोळकर)- तालुका कृषी अधिकारी बाळापूर कार्यालयाच्या वतीने भटवाडी बु येथे शेतकऱ्यांना खरीप पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे यावेळी कृषी सहायक यु एम धुमाळे यांनी सोयाबीन उगवन तपासणी बिज प्रक्रिया खत व्यवस्थापन व माती नमुने या बाबतीत सविस्तरपणे सखोल मार्गदर्शन केले तसेच कृषी पर्यवेक्षक एस पी पखाले यांनी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी या बाबतीत माहिती दिली सोशल डिस्टनसिग चा नियम पाळत सदर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी गजानन आखरे अध्यक्ष .सचिव मुरलीधर करंडे व कृषी मित्र जगदीश आखरे उपसरपंच श्रिरंग आखरे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तर प्रशिक्षणाला दत्तगुरु शेतकरी प्रोडयुसर कंपनी लिमिटेड बाळापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.