तेल्हारा (विशाल नांदोकार): सध्या देशात कोरोना व्हायरसमुळे जे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशात आपल्या देशाला या संकटातुन बाहेर काढण्यासाठी या व्हायरसला देशातून हद्दपार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आपले जे मोलाचे कार्य करत आहे तशेच पोलीस प्रशासन ज्याप्रकारे नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कटिबद्ध आहे जनतेसाठी अहोरात्र कटिबद्ध असणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस प्राशासणाच्या जीवाची काळजी म्हणून तांत्रिक सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था तेल्हारा यांच्या तर्फे रविवारी तेल्हारा पोलिस स्टेशन पूर्ण सॅनिताईज करून परिसर स्वछ करण्यात आला यावेळी ठाणेदार विकास देवरे साहेब सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते ठाणेदार साहेबांनी संस्थेचे व सर्व सभासदांचे आभार व्यक्त केले सहकारी संस्थेतर्फे लॉकडाऊनच्या काळात लोकांना त्रास होऊ नये म्हणून किराणा दुकानात न जाता घरपोच किराणा सेवा देण्यात येत आहे तशेच रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे ऑर्डरप्रमाणे घरपोच पोहचविण्यात येत आहे यासाठी डॉ.प्रवीण लोखंडे, ( जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला ) यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक सुशिक्षित बेरोजगार संस्थेचे अध्यक्ष प्रफुल बोदडे व सचिव अतुल बाळापुरे, सह संस्थेच्या सदस्यांचे प्रशासनाला मदत म्हणून उल्लेखनीय योगदान सुरू आहे.