अकोला(प्रतिनिधी)- कोरोना काळात होईल त्या पद्धतीने सेवा देण्याचे काम अनेकजण करीत आहेत.मात्र अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उभा असलेला तो पोलिस व त्याची व्यस्था हे जाणणारा एक अवलिया गेल्या पन्नास दिवसापासून पोलिसांची सेवा करीत आहे.
कोरोना काळातील कोरोना वारीयर्स पोलीस बांधव नेहमीप्रमाणे आपल्या दिलेल्या पोस्ट वर आपले कर्तव्य बजावीत असतांना गेल्या पन्नास दिवसापासून कोणीतरी सकाळ संध्याकाळ चहा पाणी पाठवून त्यांची तहान भागवित सेवा करीत होता एवढेच नाही तर तो अवलिया पोलिसांच्या गाड्या सुद्धा सॅनेटाईज करीत होता.मात्र आपल्याला रोज चहा पाणी देणारा आणि आपल्या गाड्या सॅनेटाईज करणारा कोण हे पोलिसांना माहीत नव्हते आणि माहिती काढली तर ते सुद्धा कोणी सांगत नव्हते तो कोण..आज मात्र शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक गजाजन शेळके यांनी ठरवल कोण तो अवलिया जो आपली सेवा करीत आहे तो कोण आहे तर आज त्याबाबद्दल माहिती काढली असता तो अवलिया निघाला अकोल्यातील निशिकांत बडगे गेल्या पन्नास दिवसांपासून निस्वार्थ पणे पोलिसांची सेवा करीत आला आहे.तर अकोला वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी निषिकांत बडगे यांचे आभार मानून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.अशा कोरोना काळात निस्वार्थपणे मदत करणाऱ्या निशिकांत बडगेला सलाम….