वाडेगाव (राजकुमार चिंचोळकर)- प्रज्ञा क्रांती शक्ती अपंग संस्था बाळापूर लोटनापूर च्या माध्यमातून गरजु दिव्यांग कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले आहे आज सर्वत्र कोरोना व्हायरस बाबतीत लॉकडावुन मुळे सर्व सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे तर दुसरीकडे दिव्यांग व निराधार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे सदर दिव्यांग कुटुंबांना मदतीचा हात पुढे करून प्रज्ञा क्रांती शक्ती अपंग संस्थेच्या माध्यमातून धान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे तसेच उद्योजक बाळुभाउ हीरेकर यांनी संस्थेला भरीव मदत करुन सामाजिक दायित्व निभावले असुन अपंग कल्याण राज्य पुरस्कार प्राप्त प्रकाश अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षा संगीता ठोंबरे .भोनाजी ठोंबरे यांनी मदतीचे वाटप केले आहे तर दानशूर सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्थेच्या उपक्रमाला हातभार लावन्याचे आवहान करण्यात आले आहे.