अकोला, दि.१८- बाळापूर शहरात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने शहरातील ११ भाग हे कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. ११ एप्रिल पासून प्रतिबंधित करण्यात आले होते. त्यानंतर आजतागायत शहरात नवीन पॉझिटीव्ह रुग्ण न आढळल्याने उपविभागीय दंडाधिकारी रमेश पवार यांनी बाळापूर शहरातील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करुन जारी केलेला मनाई आदेश व्यपगत करीत असल्याचे एका आदेशान्वये घोषित केले आहे.
अधिक वाचा: सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार