वाडेगाव (राजकुमार चिंचोळकर)- वाडेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील शेततळ्यातील मासे मृत्यूमुखी पडले असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना घडली आहे यामध्ये येथीलच शेतकरी विलास वरोकार यांनी शासकीय योजनेतून एक एकदाचे सामुहिक शेततळे घेतले तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी शेततळ्या मध्ये जवळपास दहा हजार रुपयांचे मासेचे बिज विकत आणून शेततळ्या मध्ये संगोपन केले तर हाताशी असलेल्या मासळी उत्पादन असतानाच शेततळ्यातील मासे मृत्यूमुखी पडले असल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे सदर शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून शेततळ्यातील मासे मृत्यूमुखी पडले या बाबतीत नेमके कारण समजले नाही.