मुंबई, दि. 18: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता.१८) आमदारकीची शपथ घेतली. अत्यंत साधेपणाने हा शपथविधी पार पडला. अन्य ८ उमेदवारांनी सुद्धा यावेळी शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषद सदस्य म्हणून आमदारकीची शपथ विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिली.
CM Shri #UddhavThackeray takes oath as the member of Legislative Council today. Chairman of the Maharashtra Legislative Council Shri RamRaje Nimbalkar administered the oath. Speaker of Legislative Assembly Shri @NANA_PATOLE present on the occasion. pic.twitter.com/ifWQyeFr82
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) May 18, 2020
राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घटनांमुळे चर्चेच राहिलेल्या आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गो-हे, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड तर भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील आणि रमेश कराड यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आल्यानंतर या ९ नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांसह या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते उपस्थित होते.आमदार म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील दुसरे व्यक्ती ठरले आहेत.