हिवरखेड (बाळासाहेब नेरकर)- कोरोना विषाणूच्या पादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर हिवरखेड परीसरातील सर्वशेतकऱ्यांना शेतीचा माल विकण्यासाठी खूप अडचणी जात आहे.त्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही.त्यात त्याचेवर अस्मानी संकट डोक्यावर आहे.गेल्या आठवड्यापासून अवकाळी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसांवर पेरणीचे दिवस जवळ आले आहे.
अद्यापही कोणत्याही बँकेने शेती कर्जाचे वाटप सुरू केले नाही.तरी बँकांनी शेती पीक कर्ज वाटप तातडीने सुरू करून पीक कर्जासाठी लागणारे कागदपत्रे हे कार्यालय बंद असल्याने शेतकरी सादर करू शकत नसल्याने कागदपत्राची अट शिथिल करावी व मागील वर्षाचे कागदपत्रे ग्राह्य धरावे, तसेच विनाविलंब निल चे दाखले बँकेकडून तातडीने दयावे, अश्या मागणीचे निवेदन तेल्हारा तहसील येथे नायब तहसीलदार विजय सुरडकर यांना हिवरखेड येथील सर्व गावकऱ्यांच्या व प्रेस क्लब हिवरखेडच्या वतीने श्यामशील भोपळे, किरण सेदानी व संवादाचे सतीश इंगळे यांनी दिले .या निवेदनावर प्रेस क्लबचे अध्यक्ष बलराज गावंडे, मनीष भुडके,गोवर्धन गांवडे, रीतेश टीलावत, जितेंद्र लाखोटीया,बाळासाहेब नेरकर ,गजानन दाभाडे. प्रा.संतोष राऊत,सागर राऊत, सुनील बजाज,संजय मानके,ज्ञानेश्वर गावंडे, प्रशांत भोपळे, राजेश अस्वार यांचासह आदी पत्रकार व नागरिकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.