शेगांव दि.१४ (सुनिल गाडगे):- अकोला अर्धवट रोड बांधकामामुळे शेतक-यांच्या शेतात जाणारा रस्ते बंद शेतकरी अडचणीत सरकार चुप ठेकेदार फरार शेतक-यांची थट्टा अकोला ते शेगांव पालखि मार्गाचे काम गेल्या तींन महिन्या पासून बंद पडले असुन अर्धवट कामा मुळे वाहतुकीला अडथळा तर येतच आहे परंतु महत्वाचे म्हणजे शेतक-यांची मोठी अडचण झाली आहे परंतू अकोल्याचे पालकमंत्री ना बच्चू कडू यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरच निर्माण झाली आहे.
युती शासन काळात जवळपास वर्ष भरा पुर्वी या पालखि मार्गाचे काम धुमधडाक्यात सुरू झाले होते शेगांव नागझरी मार्गाने अकोला हा जवळचा रस्ता असुन केवळ 35की मी वर अकोला येते त्यामुळे संत गजानन महाराजांच्या पुण्यपावन स्पर्शाने पुनीत झालेले संत नगरी शेगांव व महानगरी अकोला हे दोन मोठे महत्वाचे गांव आणी दोन जिल्हे जवळ येतात त्यामुळे सर्वच गोष्टिंची सुविधा होते तसेच पंढरपुर वारी करीता संत गजाननाची पालखी पाई वारी करीता याच मार्गाने अकोला कडे जाते थोड्याच दिवसात पाई वारी सुरू होऊ शकते
तसेच या रसत्याने दोन्हि बाजुने शेतकरी आहे सध्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्या बरोबर राज्यातील प्रकल्पांना स्थगीती दिली तसेच या रसत्याच्या कामाचे झाले आणी अर्धवट काम होऊन काम बंद पडले ठेकेदाराने अचानक एकदिवस आपला गाशा गुंडाळला त्यामुळे या रोडच्या बाजुला असलेल्या कास्तकारांची खुपमोठी अडचण झाली रसत्याच्या बाजुला अर्धवट नाल्याचे काम खोदुन ठेवले कुठे अर्धवट नाली बांधकाम कुठे बांधकामाच्या सळाका वर बांधुन ठेवल्या उकरुन ठेवलेल्या पुलांचे काम अर्धवट आहे चांगला डांबरी रस्ता खोदून काढला त्यामुळे मोठि कसरत करत प्रवास करावा लागतो
आता एका महिन्यात पाऊस येऊ शकतो पेरणीचे कामे करावी लागतात शेतात जायला शेतक-यांना रस्ता नाही या समस्येला प्रसार माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर या आधी वाचा फोडली होती परंतु निगरगट्ट प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही
कास्तकार स्वखर्चाने आपा्आपल्या शेतात जाणारे रस्ते करून घेत आहेत त्यात त्यांना शेकडो रुपये खर्च येत आहे आधीच शेतकरी प्रचंड अडचणीत आहे
या आधी विरोधात असतांना ना बच्चु कडु यांनी शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी आसुड मोर्चा काढला होता आता तेच कडु साहेब अकोल्याचे पालक मंत्री आहेत आणी अकोला सार्वजनीक बांधकाम अंतर्गत हे काम आहे मग ना कडुसाहेब लक्ष का देत नाहीत ?असा सवाल शेतकरी विचारत आहेत की ते आसुड मोर्चाची वाट पाहत आहेत?की आसुड मोर्च काढल्या शिवाय कोणत्या च सत्ताधीशांना शेतक-या़चे दुख:दिसत नाही असाही सवाल या परीसरातील ग्रामीण जनता व शेतकरी विचारीत आहेत
तरी तातडीने या परीसरातील कास्तकारांना शेतात जाण्यायेण्यासाठी जागा करुन द्यावी व या रसत्याचे बाधकाम तातडिने सुरू करावे अशी मागणी करण्यात येत आहे