वाडेगाव (राजकुमार चिंचोळकर)- बाळापूर नगर परिषद कडून शहरातील अपंग बांधवांना आर्थिक मदत देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे आजमीतीला सर्वत्र कोरोना व्हायरस संसर्ग प्रादुर्भावामुळे जारी करण्यात आलेल्या लाॅकडावून मुळे आथिर्कदृष्ट्या खचलेल्याची परिस्थिती सर्व सामान्य नागरिकावर येवून ठेपली आहे तर बाळापूर नगर परिषदेकडून अपंग बांधवांना आर्थिक मदतीचा हातभार लावन्याच्या प्रयत्ना मध्ये अपंग बांधवांच्या घरोघरी जाऊन नगर परिषद कर्मचारी यांच्या वतीने आथिर्क मदत व एक मास्क देण्यात येत असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोपीचंद पवार यांनी दिली असुन आपला जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर न पडता शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहनही नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोपीचंद पवार यांनी केले आहे.