बोर्डी (देवानंद खिरकर )- अकोट तहसील अंतर्गत येणाऱ्या ग्राम बोर्डी येथे रेतीच्या वाहतुकीची माहिती देतो या कारणावरून एकास मारहाण केल्या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सविस्तर वृत्त असे आहे की तालुक्यातील बोर्डी येथे दररोज रात्री खुलेआम अवैध मार्गाने रेतीची चोरी करून धंदा चालवल्या जातो. सद्या संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु असतांना मात्र बोर्डी येथे रात्रीच्या सुमारास घोगा नाला मधुन रेतीची चोरी करुन विकल्या जात आहे. काल रात्री याच कारणावरुण बोर्डी येथिल अक्षय रमेश ढोक हा शेतात रात्री मजुरीने संत्र्याच्या झाडाला पाणी देन्या करीता शेतात गेला असता शेतात रात्री १ वाजताच्या सुमारास बोर्डी येथिल शाम अर्जुन लटकुटे,संतोष सुरेश रिंगणे,लखन धनराज गुरेकार या तिघांनी अक्षय रमेश ढोक याला लाथा बुक्यांनि मारहाण केली व जीवाने मारण्याची धमकी दिली या वरुन अक्षय रमेश ढोक याने ग्रामीण पोलिस स्टेशन अकोट येथे दीलेल्या फिर्यादी वरुन शाम अर्जुन लटकुटे,संतोष सुरेश रिंगणे,लखन धनराज गुरेकार या तिघा विरुध्द 323,504,506,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरी महसूल विभाग अकोट व तलाठी बोर्डी यांनी बोर्डी येथे रात्रीची गस्त घालून सुरु असलेली रेती चोरीचे ट्रक्टर पकडून कारवाई करने गरजेचे आहे. मात्र या बाबत तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांना पूर्णपणे माहीती असून सुध्दा हेतूपुरस्पर पणे कारवाई करण्यात येत नसल्याची चर्चा नागरिकाकडून होत आहे. या बाबत वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देवून बोर्डी येथिल सुरु असलेली अवैध रेतीची चोरी तात्काळ थांबवावी अशी मागणी होत आहे.