अकोट(प्रतिनिधी)-कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्यामुळे जिथे दारूचे दुकान नाही अशा ठिकाणच्या तळीरामांची पंचाईत झाली असून अशा तळीरामांना अवैध मार्गाने दारूची विक्री सुरू आहे अशातच अवैध दारू वाहतूक करणाऱ्याला आज एसडीपीओ पथकाने रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार एस डी पी ओ पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचून आज दि १४ मे रोजी दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत संतोष महादेव इंगळे(३८) याला कावसा नजीक अवैध देशी दारूची वाहतूक करतांना रंगेहाथ पकडले.यावेळी त्याच्याकडून १९० क्वाटर किंमत ११ हजार चारशे व एक दुचाकी किंमत २५ हजार असा एकुण ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कारवाई श्री सुनिल सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे,पो हे कॉ राजू खर्चे , पोहेकॉ नंदकिशोर चोपडे, पोहेकॉ प्रशांत उज्जैनकर, पोकॉ.हर्षद देशमुख , यांनी केली.