अकोला, दि.१४: लॉकडाऊन कालावधीत अकोला जिल्ह्यात अडकलेले व मुळचे वारंगल तेलंगाणा येथील रहिवासी असलेल्या ३३ मजूरांना आज दोन विशेष एस. टी बसने धर्माबाद या तेलंगाणा सिमेवरील गावापर्यंत सोडण्यासाठी अकोला येथून विशेष एस.टी. बस रवाना झाली. या बसला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे स्वतः उपस्थित होते.
या ३३ मजूरांना वारंगल येथे जावयाचे आहे. आज दुपारी १२ वाजता ही बस रवाना झाली. या सर्व प्रवाशांना दोन बसेसद्वारे रवाना करण्यात आले. त्यांचे सोबत पिण्याचे पाणी , जेवणाचे पॅकेट देण्यात आले. या सर्व प्रवाशांना मोफत पाठवण्यात आले असून कोणतेही भाडे आकारण्यात आले नाही. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे, रा. प. विभागनियंत्रक चेतना खिरवाडकर आणि विभागीय वाहतुक अधिकारी स्मिता सुतवणे, आगार व्यवस्थापक प्रमोद इंगळे यांची उपस्थिती होती.