तेल्हारा (प्रतिनिधी)- कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे घरातच राहाव लागत असल्याने बरेच जण आपल्या कल्पनेतून जे सादय होईल करण्याचा पर्यन्त करीत आहे.
लॉकडाऊन मुळे बऱ्याच जणांना घरी बसावे लागत आहे त्यामुळे लॉकडाऊन चे दिवस कसे काढावे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे मात्र तेल्हारा येथील व्यवसायीक संजय टेकाडे यांनी पहिल्या लॉकडाऊन च्या काळात वेळेचा सदुपयोग करून आपल्या स्वप्नातील घर बनवण्यास सुरुवात केली.आणि ते घर अवघ्या २३ दिवसात त्यांनी पूर्ण केले तुम्ही म्हणाल २३ दिवसात घर कसे काय तर ते स्वप्नातील घर आईस्क्रीम च्या कांड्यापासून बनवले घर आहे.पहिल्या लॉकडाऊन काळात टेकाडे यांनी साडे तीन हजार आईस्क्रीम च्या काड्या पासून रोज थोडं थोडं करून आपल्या स्वप्नातील घर बनवले.यावेळी घर बनविताना त्यांच्या घरचे बांधकाम मिस्त्री म्हणून संबोधत असत. लॉकडाऊन काळात काय करावे म्हणून संजय टेकाडे यांनी आपल्या स्वप्नातील घर तयार केले.हे त्यांचे स्वप्नातील घर त्यांच्या मुलीच्या लग्नात भेट देऊन या कोरोनाच्या लॉकडाऊन काळातील आठवणी देणार आहेत हे विशेष.