• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

बाधीत होण्याचे प्रमाण तरुणांत तर मृत्यूचे प्रमाण वयस्कांत जास्त

Media Desk by Media Desk
May 22, 2020
in अकोला जिल्हा, Featured, अकोला, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
corona-virus-in-indian-villages
12
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१३ – जिल्ह्यात आज (दि.१३) सकाळ पर्यंत बाधीतांच्या संख्येचे वयोगटनिहाय विश्लेषण केले असता कोरोना विषाणू संसर्गाने बाधीत होण्याचे प्रमाण हे २१ ते ३० या वयोगटातील लोकांचे सर्वाधिक आहे. या वयोगटातील ४१ जण कोरोना बाधीत आहेत. तर मृत्यूचे प्रमाण हे वयस्कात जास्त आहे. एकूण १५ मृतकांपैकी नऊ जण हे ५० ते ७० या वयोगटातील आहेत हे विशेष. त्यातील सर्वांनाच विविध जुन्या व्याधी होत्या.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची वाढत असलेली संख्या पाहता त्याचा फैलाव होतोय हे तर नक्कीच. पण कोरोना रुपी शत्रूने आतापर्यंत आपल्यातल्या जवळपास १५ व्यक्तिंना काळाच्या उदरात गडप केले आहे. थोडक्यात ते कोरोना विरुद्धची लढाई हरले. तर आतापर्यंत ६० जण ही लढाई जिंकून यशस्वीरित्या घरी गेले आहेत. कोरोना बाधीत व्यक्तींच्या व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला जिल्ह्यात आज अखेर(दि.१३) आढळलेले सर्वाधिक रुग्ण हे महानगरपालिका क्षेत्रातील म्हणजे १७० रुग्ण हे मनपा हद्दीच्या भागातील आहेत. अन्य नगरपालिका हद्दीत आठ तर ग्रामिण भागातील तीन जण आहेत. अकोला शहरातील व ग्रामिण भागातील मिळून तब्बल ४२ ठिकाणांहून रुग्ण आढळले आहेत. भागनिहाय बाधितांची संख्या पाहिल्यास बैदपुरा या भागात सर्वाधिक म्हणजे ४६ रुग्ण आढळले. त्याखालोखाल ११ रुग्ण ताजनगर, मोहम्मद अली रोड नऊ, मोमीन पुरा आठ, न्यू भिमनगर, माळीपुरा आणि पातूर येथील सात, कृषि नगर येथील सहा, अकोट फैल येथील पाच. सिंधी कॅम्प चार व अन्य भागात एक ते दोन रुग्ण आढळून आले आहेत.

जे रुग्ण पॉझिटीव्ह आढळले त्यांचे वयोगट पाहता आतापर्यंत फक्त सहा जण हे वयवर्ष पाच पेक्षा कमी आहेत. आठ जण दहा वर्ष वयाच्या आतील आहेत. २१ जण ११ ते २० वर्षे वयोगटातील आहेत. तर सर्वाधिक रुग्ण संख्या असलेला गट हा २१ ते ३० वयोगटातील आहे त्यांची संख्या ४१ आहे. वय वर्षे ३१ ते ४० या वयोगटात ३३ जण आहेत तर ४१ ते ५० या वयोगटात ३२ जण आहेत. ५१ ते ६० या वयोगटात २१ जण असून ६० पेक्षा अधिक २७ जण रुग्ण आहेत.

जे लोक उपचार घेतांना मयत झालेत. त्यांची संख्या आज १५ झाली आहे. त्यात एक आत्महत्या आहे. त्यामुळे कोवीडचे उपचार घेतांना १४ जण मयत झाले आहेत. या १४ जणांपैकी पाच जण हे मृतावस्थेतच रुग्णालयात आणले होते. तर ९ जणांचा मृत्यू हा दवाखान्यात उपचारा दरम्यान झाला आहे. तर मयत झालेल्या व्यक्तिंपैकी १२ व्यक्तींना काहीतरी अन्य जुन्या व्याधी होत्या. उदा. उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे विकार, हृदयविकार इ. मृतांपैकी सर्व जण हे प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवासी आहेत. तर वयोगटनिहाय विचार केला असता मयत पावलेल्या १५ जणांपैकी नऊ जण हे ५० ते ७० या वयोगटातील आहेत. केवळ एक जण तीशीच्या आतला होता. अर्थात त्याने आत्महत्या केली होती. उर्वरीत पाच जण हे ७० पेक्षा अधिक वयाचे होते. आणि मयतांपैकी ७ पुरुष आणि आठ महिला असे प्रमाण आहे.

Tags: coronacorona news akola
Previous Post

अकोलेकरांना दिलासा सायंकाळच्या अहवालात शुन्य पॉझिटिव्ह ,एकूण कोरोबाधितांची संख्या १८६

Next Post

सविस्तर – ४१ जणांना डिस्चार्ज; कोरोनामुक्तांची संख्या ६०; एक मयत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कोरोना व्हायरसची हि लक्षणं कोणती, त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?

सविस्तर - ४१ जणांना डिस्चार्ज; कोरोनामुक्तांची संख्या ६०; एक मयत

maharashra-police-

आताच्या घडीचे कोरोना योध्दा पोलिसांकडे शासन लक्ष देणार का ! जीवाची पर्वा न करता लढतोय हा योद्धा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.