• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

स्वतः पालकमंत्रीच शेतकऱ्याला निरोप देतात तेव्हा… मुर्तिजापुर येथील कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित

Team by Team
May 12, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
cotton-procurement
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१२ – ‘हॅलो, मी बच्चू कडू बोलतोय, भाऊराव फाटे बोलतात का? आपण कापुस खरेदीसाठी नोंदणी केली आहे. तर आपण आता उद्या या सकाळी नऊ वाजता, ओम जिनिंग फॅक्टरीला…’ दस्तूरखुद्द पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनीच शेतकऱ्यांना फोन करुन कापूस खरेदीसाठी येण्याचा निरोप दिला, आणि सीसीआय मार्फत मुर्तिजापुर येथे सुरु झालेल्या कापूस खरेदी केंद्रावरील कापूस खरेदीची प्रक्रिया कार्यान्वित झाली.

येथील मुर्तिजापुर तालुक्यासाठी सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून तेथील ओम जिनिंग फॅक्टरी येथे कापूस खरेदी प्रक्रियेसाठी तयारी सज्ज करण्यात आली आहे. आज प्रशासनाने केलेल्या या खरेदी तयारीची पाहणीही राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, शालेय शिक्षण, महिला व बालविकास कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज मुर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापूस खरेदी केंद्रास भेट दिली. यावेळी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे, उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते, तालुका खरेदी विक्री संघाचे सचिव रितेश मडगे, सहाय्यक जितेंद्र कांबे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माहिती देण्यात आली की मुर्तिजापुर येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री साठी ८५८ शेतकऱ्यांनी कालपासून (दि.११) नोंदणी केली आहे. या ठिकाणी ओम जिनिंग फॅक्टरी येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना आधी फोन वरुन नोंदणी करता येणार आहे. त्यानुसारच शेतकऱ्यांना फोन करुन आपला कापूस खरेदी केंद्रावर आणण्याबाबत सुचना दिली जाणार आहे. यावेळी स्वतः पालकमंत्र्यांनीच ही सुचना शेतकऱ्यांना देऊन खरेदी प्रक्रियेचा निरोप दिला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

त्यानंतर कृषि उत्पन्न बाजार समिती मुर्तिजापुर आवारातील नाफेडच्या तुर व हरभरा खरेदी केंद्रास पालकमंत्री ना. कडू यांनी भेट दिली. यावेळी व्यवस्थापक धिरज मुळे यांनी आतापर्यंत शासनाकडून ९८८ शेतकऱ्यांची १४ हजार ५०० क्विंटल तुर व ३०५ शेतकऱ्यांचा सहा हजार ५०० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास शेतमाल विक्रीस आणतांना होवू नये, असे निर्देश पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी दिलेत. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी ओम जिनिंग फॅक्टरीला भेट देवून कापूस खरेदीसाठी करण्यात आलेल्या तयारीची पाहणी केली व योग्य सुचना संबंधीतांना दिल्या.

अधिक वाचा: बाळापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जुगार अड्डे जोमात

Tags: अकोलापालकमंत्री ना. ओमप्रकाश बच्चू कडू
Previous Post

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा -पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Next Post

पालकमंत्री ना.बच्चू कडू यांची मुर्तिजापूर उपजिल्हा रूग्णालयास भेट

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Bachchu kadu visited hospital

पालकमंत्री ना.बच्चू कडू यांची मुर्तिजापूर उपजिल्हा रूग्णालयास भेट

agriculture minister dadaji bhuse

राज्यातील चारही कृषि विद्यापीठ परीक्षा नियोजनाचा कृती आराखडा जाहीर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.