• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा -पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Team by Team
May 12, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
meeting with bachu kadu
21
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१२ – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख़्या वाढत असल्याने बाधीत रुग्णांना उपचार व अन्य सुविधा देण्यासोबतच फैलाव होत असलेला संसर्ग कसा रोखावा? यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, महापौर अर्चनाताई मसने, विधानपरिषद सदस्य आ.डॉ. रणजित पाटील, आ.गोपिकिशन बाजोरिया, विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

यावेळी झालेल्या चर्चेत अकोला जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येचा विविध क्षेत्रनिहाय आढावा घेण्यात आला. आतापर्यंत पॉझिटीव्ह आढळलेल्या १६३ रुग्णांपैकी १५२ हे मनपा हद्दीतील आहेत. तर नगरपालिका हद्दीतील आठ व ग्रामीण क्षेत्रातील तीन आहेत. जिल्ह्यात कोवीड हॉस्पिटल या सेवेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३२ क्षमतेच्या रुग्णालयाची सोय आहे. शिवाय दोन खाजगी रुग्णालयांमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून ती अत्यावश्यक वेळी वापरण्याचे नियोजन आहे, असे ३८२ खाटांचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पालकमंत्री ना. कडू यांनी निर्देश दिले की, पॉझिटीव्ह रुग्ण संख़्या वाढत असतांना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी व नंतर संसर्ग झाल्यास उपचार करण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टिने संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात प्रतिबंधांची अधिक कडक अंमलबजावणी करा. व्हिडीओ कॅमेरे लावून सर्व हालचालींवर नजर ठेवा. व नियमभंग करणाऱ्याविरुद्ध कारवाई करा. अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्रात राहतात त्यांना कामानिमित्त प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जावे लागते अशा कर्मचाऱ्यांची प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर निवासाची सोय करा. या शिवाय सर्वेक्षणाचा वेग वाढवून प्रत्येक घराचे सर्वेक्षण करा. जे प्रशासनाला सहयोग करणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असेही त्यांनी सांगितले.

बाधीत रुग्ण दाखल झाल्यावर त्यांच्या उपचाराची सुसुत्र पद्धती असली पाहिजे. संदिग्ध रुग्ण आल्यानंतर त्याची चाचणी, त्यानंतर त्याचा अहवाल आणि त्यानंतर त्याचेवर करावयाचे नेमके उपचार याबाबत सुष्पटता असावी व रुग्णाला त्याच्या नातेवाईकांना त्याची कल्पना द्यावी. जेणे करुन त्यांचा संभ्रम होता कामा नये. रुग्णसेवेसाठी खाजगी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करावयाची झाल्यास त्याचा खर्च हा जिल्हा नियोजन समितीच्या खर्चातून करता येईल का याबाबत वित्त विभागाचे मार्गदर्शन मागवून कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात बाहेरुन येणारे व जिल्ह्यातून बाहेर जाऊ इच्छिणारे सर्व प्रवासी, मजूर, यात्रेकरु यांच्या ने- आण करण्याच्या नियोजनाचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

अधिक वाचा: बाळापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जुगार अड्डे जोमात

Tags: अकोलाजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरपालकमंत्री ना.बच्चू कडू
Previous Post

सविस्तर; ८१ अहवाल प्राप्तः नऊ पॉझिटीव्ह, ७२ निगेटीव्ह; पाच जणांना डिस्चार्ज

Next Post

स्वतः पालकमंत्रीच शेतकऱ्याला निरोप देतात तेव्हा… मुर्तिजापुर येथील कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
cotton-procurement

स्वतः पालकमंत्रीच शेतकऱ्याला निरोप देतात तेव्हा... मुर्तिजापुर येथील कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित

Bachchu kadu visited hospital

पालकमंत्री ना.बच्चू कडू यांची मुर्तिजापूर उपजिल्हा रूग्णालयास भेट

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.