नवी दिल्ली : देशात कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ते आज काय बोलणार आहेत. कोमती घोषणा करणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे.
देशात कोविड-१९ च्या संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत ८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ३ हजार ६०४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत नवीन रुग्णांमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. काल (दि. ११) चार हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ७० हजार ७५६ लोकांना संसर्ग झाला आहे. त्याच वेळी, २ हजार २९३ लोकांचा मृत्यू झाला आहे. २२ हजार ४५५ लोक बरे झाले आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना संबोधन अवर अकोला LIVE TV वर बघू शकता , दि. १२ मे २०२०
वेळ: ८.०० वाजता https://ourakola.com/livetv/