पातुर (सुनिल गाडगे) : पातुर परीसरात बिबट्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन शेतकरी वर्ग भयभीत झाला . या गंभीर विषयाकडे वनविभाग कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने आता शेतकऱ्यांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पातुर जिरायत बगायत परीसरात पुर्णता सिंचनाची व्यवस्था असल्याने हा पुर्ण परीसर बगायती असुन. शेतकरी रात्रंदिवस रखवाली करतो. परंतु गेल्या आठ दीवसापासुन या परीसरात बिबट्या वास्तव्य वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. या बाबत जेष्ठ पत्रकार डिंगाबर खुरसडे यांनी वनविभागाला याची माहीती दीली परंतु वनविभाग कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. आपले मोबाईल रिसुव्ह करत नाही. असा आरोप करण्यात येतो. वनविभाग शेतकऱ्यांचा बळी घेण्याची वाट पाहत आहेत का ? वनकर्मचार्याना शेतकऱ्यांचे काही एक घेणे नाही कारण शेतकऱ्यांचे काम केलेतर मोबादला मिळत नाही. रोपवाटीके मध्ये लाखो रुपयाची कमाई चालु आहे. जंगलात मजुर न लावता जेसीपी ने काम चालु आहेत. मेलेल्या झाडाला दररोज पाण्याचे टँकर चालु आहेत वनकर्मचारी कोरोणाचा पुर्ण आर्थिक फायदा करुन घेत आहे. खाल पासुन वर पर्यत पुर्ण भागीदारी चालु आहे. बिबट्याने शेतकरी मारला तर यांना या अर्थपुण व्यवहारामुळे जाग पण येणार नाही अशी भ्रष्ट व्यवस्था पातुर वनविभागाची झाली आहे. या बाबत शेतकऱ्यांचा पुळका असणारे आमदार नितीन देशमुख शेतकऱ्यांना न्याय देतील का ? भ्रष्ट व कामचुकार वनकर्मचार्याना वढणीवर आणणार का असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.