तेल्हारा(प्रतिनिधी)- आज सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या पथकाने शहरात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली असता ११ जुगारीना पकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संपुर्ण जगात कोरोना या महामारीने जग हादरले असतांना उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आले आहे मात्र काही बहाद्दर या लॉकडाऊन चा फायदा कुठलीही काळजी न घेता जुगार खेळत आहेत असाच काही प्रकार शहरात सुरू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली त्यावरून पथकाने सापळा रचून साई नगर मधील एका घराजवळ जुगार खेळणाऱ्या ११ जणांना रंगेहाथ पकडले यामध्ये आरोपी पराग प्रकाश अग्रवाल (२३),सागर अशोक धोत्रे(२५),सुनील मनोहर कदम(३२),नवीन नरेश मुराई(२३),राजेश नारायण बोरकर(२१),नितेश शामसुंदर मुराई(३१),आशिष शांताराम कुमकर(३८),अक्षय गोविंदराव शिंगणारे(१९),मनोज सत्यनारायण पाळीवल(२७),राजू गणेश खरतडे(२६),दत्त सिराम पकदणे सर्व राहणार साई नगर तेल्हारा यांच्याकडून मोबाईल नगद असा १४८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अनुराधा पाटेखेडे,राजू खर्चे, उज्जेनकर,हर्षद देशमुख,चोपडे यांनी केली.