अकोट(शिवा मगर): दि.10 मे रोजी अकोट तालुक्यात गारपीट व अवकाळी वादळी पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या वर्षी अकोलखेड मंडळ , अकोली जहागीर मंडळ , उमरा ,लाडेगाव, मुंडगांव या मंडळातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या मध्ये संत्रा (अम्बीया बार ) निंबु , कांदा , मक्का , भुईमुंग , केळी , टरबूज , व भाजीपाले अक्षरशा हरबरा एवढया गारीणे पिके अक्षरशा उदवस्त झाली. अगोदरच कोरोना सारख्या भयानक रोगाच्या परिस्थिती मध्ये प्रत्येक जन संकटाच्या सामना करीत आहे. पण या काळात फक्त शेतकरी राजा च आपल्या पाठी मागे उभा आहे. अशा वेळी शासनाने बाकीचे कामे बाजूला ठेवून नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्यात यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे त्यांना लवकरात लवकर विमा कंपनी ने शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात येणाचा आदेश विमा कंपन्या ना द्यावा.सकाळी कोणतेही अधिकारी पंचनामा करण्याकरिता आलेला नाही .अश्या लेखी सूचना निवेदना द्वारे जिल्हाधिकारी अकोला व उपविभागीय अधिकारी अकोट , तहसीलदार अकोट यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे ,तालुका प्रमुख शाम गावंडे , शहर प्रमुख सुनील रण्धे , यांनी दिले आहे.