कोरोनाच्या लढाईत महत्वाची भूमिका निभावणारे राज्यातील कोरोना वारीयर्स ६४९ पोलीस कर्मचारी आणि ४२ पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या सगळ्या प्रयत्नांमध्ये मुंबईतील तीन आणि पुण्यातील एक अशा चार पोलीस कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला ही बाब दुर्दैवी आहे असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.
आज अकोल्यात सकाळी आलेल्या दोन पॉझिटिव्ह अहवालात अकोल्यातील एका ५५ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे .आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात एक ५५ वर्षीय इसम असून तो मोठी उमरी भागातील रहिवासी आहे तर अन्य एक ११ वर्षीय मुलगा असून तो किल्ला चौक जुने शहर या भागातील रहिवासी आहे.
आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या धर्तीवर जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. तर दूसरीकडं सूत्रांनी दिलेल्या माहितीहून आज २० ते २२ रुग्ण पूर्णता बरे झाल्यानं त्यांना सायंकाळी सुटी देण्यात येणार आहे.