बोर्डी(देवानंद खिरकर ): अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळा मधे काल सायंकाळी दरम्यान झालेल्या वादळी वारा,अवकाळी पाऊस, व गारासह संत्रा उत्पादक शेतकर्याचे आंबीया बहार पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.या आधी सुध्दा विम्याच्या लाभापासून फक्त अकोलखेड मंड़ळच वगळण्यात आले होते.व आताही अकोलखेड मंडळातिल शेतकर्याचे संत्रा आंबीया बहार पिकाचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे.सद्या सुरु असलेल्या कोरोना विषाणु मुळे संपुर्ण लॉक डाऊन सुरु आहे.या मुळे शेतकरी आणखीच संकटात सापडलेला आहे.तरी याची त्वरित दखल घेऊन शासनाने संत्रा उत्पादक शेतकर्याच्या शेतीचे पंचनामे करुन शासनाकडून शेतकर्यांना लवकरात लवकर मदत मिळुन द्यावी या करिता आज अकोलखेड मंडळातिल शेतकरी यांनी तहसिल कार्यालय अकोट येथे येवुन आज निवेदन दिले आहे.निवेदन देतेवेळी धीरज साहेबराव ढोणे,दिपक जगन्नाथ खिरकर,शुभम गजानन गावंडे,अनंत देवीदास घोरड,सुधिर नागोराव भिल वासुदेव गजानन वानखडे,कुलदीप दिलीप घोरड,सागर श्रीराम भालतीडक,पुंडलीक विश्वनाथ बोरोकार,देवानंद रमेश खिरकर,राजकुमार ठाकरे,भास्कर मारोटकार,अजय तिवाणे,शिरीष महल्ले,योगेश भिल,रविंद्र घोरड,यांचेसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.