मुंबई, १० मे २०२०: यूनियन बँक ऑफ इंडियाने सर्व कालावधीच्या कर्जावरील ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स’ आधारित कर्ज व्याज दरात ‘एमसीएलआर’ ५-१५ बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. बँकेने ओव्हरनाइट एमसीएलआर १५ बेसिस पॉइंट्सनी कपात करून ७.१५%, १ महिन्याचे एमसीएलआर १० बेसिस पॉइंट्सनी कमी करून ७.४०% आणि ७.५५ % एवढे केले आहेत. एका वर्षाचे एमसीएलआर ७.७५ टक्क्यांवरून ७.७० टक्के केले आहे. सुधारीत एमसीएलआर ११ मे २०२० पासून लागू होतील. जुलै २०१९ नंतर बँकेद्वारे घोषित केलेल्या दरात ही सलग अकरावी कपात आहे.