मुंबई- मटका किंग म्हणून ओळखले जाणारे रतन खत्री यांचे शनिवारी निधन झाले आहे . मुंबईत शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला यावेळी ते 88 वर्षाचे होते. रतन खत्री हे मुंबईतील नवजीवन सोसायटी येथे राहत होते. 1960 मध्ये त्यांनी भगत सोबत मटक्याच्या कामाला सुरुवात केली होती. त्यावेळी ते भगत जवळ मॅनेजर म्हणून होते तदनंतर काही कारणास्तव त्यांनी स्वतःचा रतन मटका या नावाने मटक्याचा व्यवसाय सुरू केला होता, पाहता पाहता त्यांचा व्यवसाय फार लोकप्रिय झाला होता. त्यावेळी संपूर्ण राज्यातून त्यांच्या व्यवसायात दररोज सुमारे एक कोटींची उलाढाल होत होती. इंग्रजांच्या काळापासूनच देशात आकड्यांचा जुगार हा फार प्रसिद्ध व सामान्य जनतेचा आवडीचा होता. रतन खत्री यांच्या निधनाने जुगारी लोकांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे.