अकोट ( शिवा मगर)- दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चोहोटा बाजार येथिल वार्ड न 03 मध्ये काही इसम 52 तास पत्यावर जुगार खेळत आहे अशी माहिती ठाणेदार श्री प्रेमानंद कात्रे याना मिळाली या माहितीच्या आधारे दहीहंडा पोलीसानी जुगारावर रेड केली असता काही इसम 52 तास पत्यावर जुगार खेळताना मिळून आले, त्यांचे जवळून 25230 /-रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला.एकीकडे प्रशासन सोशल डिष्टशिंग पाळा या विषयी सांगत आहे परंतु काही इसम आहेत जे या आदेशाला धाब्यावर बसवून जुगार सारखे रिकामे उद्योग करीत आहेत, या मुळे कोरोना व्हायरस पादृभाव वाढण्यास मदत होईल, काही दिवस अगोदर उगवा येथे कोरोना पॉझिटिव्ह पेशन्ट निघाला आहे ,उगवा आणि चोहोटा बाजार अंतर खूपच कमी आहे हे विशेष!!!
आरोपीचे नावे खलील प्रमाणे आहेत,
1)प्रमोद जगन्नाथ बुंदे
.2.)संतोष जयश्रीराम काकडे
3.)रोहित सुधाकर लाहोडे
4.) महेश शाळीग्राम टाले
5).सिकंदर शहा कुशदिल शहा
6.)कृष्णा जीवन बुंदे
7)रमेश शेषराव मानकर
.8)कुरुंमदास विठ्ठल बुंदे
.9)जगदीश जनार्दन मुकिंदे
सर्व रा चोहोटा ता अकोट यांचेवर मुंबई जुगार कायदा कलम 12 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे ,ही कारवाई ठाणेदार श्री प्रेमानंद कात्रे यांचे मार्गदर्शन खाली पोलीस कर्मचारी विजय सावदेकर ,दयाराम राठोड, सुभाष वाघ यांनी केली