भारत आणि चीनी सैनिकांमध्ये उत्तरी सिक्कीममध्ये नाकुला सेक्टरमध्ये झडप झाली आहे. दोन्हीकडील सैनिक जखमी झाले आहेत. उत्तरी सिक्कीमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांची झडप झाल्याचे भारतीय लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
या झडपमध्ये काही सैनिक जखमी झाले आहेत. दोन्ही देशांच्या सैनिकी तुकड्यांमध्ये अत्यंत आक्रमक झडप झाली. ही झडप नाकू ला सेक्टरमध्ये झाली. यावेळी काही सैनिक जखमी झाल्याचे पहिल्या अधिकाऱ्याने दिली. यामध्ये चार भारतीय जवान आणि सात चीनी सैनिक जखमी झाले. यावेळी १५० सैनिक भिडले होते. अशी माहिती दुसऱ्या अधिकाऱ्याने दिली.
आक्रमक झडप झाल्यानंतर स्थानिक पातळीवर वाद मिटवण्यात आला. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. चीनी सैनिकांचा उद्दामपणा भारतीय लष्कराला नवीन नाही. ऑगस्ट २०१७ मध्येही अशीच घटना घडली होती. यावेळी एकमेकांवर दगडफेकही झाली होती. लडाखमध्ये हा प्रकार झाला होता.
डोकलाममध्ये उभय देश आमनेसामने आल्यानंतर हा प्रकार सीमारेषेवर झाला होता. डोकलाममध्ये उभय देशांचे सैन्य ७३ दिवस आमनेसामने आले होते. शेवटील दोन्ही देशांनी माघार घेतल्याने प्रसंगावर पडदा पडला होता.