अकोला दि. ९ – राज्यात स्थलांतरित कामगारांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवाशी भाडे न आकारण्याची मागणी अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केली होती त्यांचे मागणीला यश आले असून कामगारां कडून भाडे न घेता कामगारांचे स्थलांतर होणार असल्याची माहिती वंचित बहूजन आघाडी चे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थलांतरित होणाऱ्या कामगारांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवाशी भाडे आकारण्यात येऊ नये, तसेच त्यांना त्यांच्या नियोजित स्थळी सोडण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला केली होती
अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्य सरकार कडे केलेल्या मागणीची दखल घेऊन लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या प्रवाशांना आपल्या घरी जाण्यासाठी सोमवारपासून एसटीची मोफत सेवा देणार असल्याची माहीती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
त्यामुळे वंचित समुहाच्या कामगारांना जीव धोक्यात न घालता आपल्या गावी जाता येणार अाहे.