अकोला दि. 8 मे 20 – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये आजपर्यंत जवळपास 19 विविध भागांमध्ये कोरोना संक्रमीत आढळून आले असून त्या अनुषंगाने कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आलेल्या भागात हायरीस्क मध्ये काम करणा-या मनपा कर्मचा-यांची व त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोरोना विषाणूची लागण होउ नये यासाठी केंद्रीय राज्य मंत्री मा.ना.श्री संजयती धोत्रे यांच्या होमीओपॅथीक औषधी देणे संदर्भात असलेल्या विशेष आग्रहावरून तसेच आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनेनसार प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये काम करणा-या मनपा कर्मचारी व त्यांच्या परिवारतील सदस्यांची रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आमदार श्री रणधीर सावरकर व महापौर सौ.अर्चना जयंत मसने, उपमहापौर राजेंद्र गिरी, माजी महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती सतीष ढगे यांच्या विनंती वरून हेनेमनयीन होमीओपॅथीक फोरम अकोलाच्या वतीने शहरातील हायरीस्क क्षेत्रामध्ये काम कारणा-या कर्मचा-यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी प्रत्येकी पांच औषधीचे पाकिटे त्यांची रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्याकरिता औषधीचे वितरण करण्यासाठी अकोला शहराच्या महापौर सौ.अर्चना मसने यांच्याकडे 6500 पॅकेट असलेले औषधीचे 6 बॉक्स सुपुर्द करण्यात आले. सदर औषधी तीन दिवस घेणे बंधनकारक असून सदर औषधी दररोज उपाशी पोटी 4 गोळ्या प्रमाणे घ्यायचे आहेत. औषधी संदर्भात अधिक माहिती पाहिजे असल्यास पैकेटमध्ये संबंधीत डॉक्टरांचे मोबाईल नंबर दिलेले असून त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी फोरमच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हेनेमनयीन होमीओपैथीक फोरम अकोला यांच्या वतीने देण्यात आलेली औषधी बनविण्याकरिता
फोरमच्या सदस्यांनी अतिशय मेहनत घेउन, स्वखर्चाने औषधी तयार करून प्रत्येक पॅकेट तयार करून त्यामध्ये डॉक्टराचा मोबाईल नंबरची माहिती टाकून सर्वांना औषधी कशा प्रकारे घ्यावी यासंदर्भातील माहिती विचारता येईल यासाठीची व्यवस्था केलेली आहे यासाठी आमदार श्री रणधीरजी सावरकर, महापौर सौ.अर्चना जयंत मसने, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपमहापौर राजेंद्र गिरी, स्थायी समिती सभापती, माजी महापौर विजय अग्रवाल यांनी फोरमच्या सर्व डॉक्टरांचा कौतुक करून त्यांचे आभार मानले.
यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच यावेळी हेनेमनयीन होमीओपैथीक फोरम अकोलाच्या डॉ.प्रिती भारूका(अग्रवाल), डॉ.कपील भाटी, डॉ.राहुल अंबाडकर, डॉ.सचितानंद गोसावी, डॉ.प्रकाश डिक्कर, डॉ.रवि पवार, डॉ.गौरी भाटी, डॉ.योजना डागा (अंबाडकर), डॉ.उज्वला भटकर (ताथोड), डॉ.पी.ए.लटुरिया, डॉ.विभा औतकर, डॉ.श्वेता मस्के तसेच नेहा कनोजिया व आफ्रिन हयात यांच्या सौजन्याने औषधी पुरविण्यात आली आहे. यावेळी जयंत मसने, संजय गोटफोडे, विनोद मनवानी, मनोज शाहू, अतुल अग्रवाल यांची उपस्थिती होती.
शहरातील सर्व नागरिकांनी, घरातच थांबणे खूप गरजेचे आहे, फक्त जीवनावयक वस्तू खरेदीसाठी जातांना व खरेदी करतांना सोशल डिस्टसींग नियमाचे काटेकोर पणे पालन करून व सेनीटायझर किंवा साबणाने वारंवार हात धुणे तसेच चेह-यावर मास्क किंवा चांगला धुतलेला रूमाल नेहमी बांधून कोरोना विषणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रत्येकानी सहकार्य करणे अत्यंत गरजेचे असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार रणधीरजी सावरकर यांनी केले आहे.
अधिक वाचा: बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल!