अकोला दि. 8 मे 20 – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना संक्रमीत रुग्णांची वाढती संख्या पाहता व यावर प्रभावी पणे नियंत्रण आणण्यासाठी मनपा आयुक्त यांच्या आदेशान्वये आकोला शहरातील खाजगी डॉक्टर्स, मेडीकल दुकान चालक व समाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने सर्वप्रथम स्थानिक फतेह चौक स्थित सांगलीवाला शोरूम जवळ कोरोना बाधित क्षेत्रामधील सर्दी, खोकला, ताप व घसादुखी यारखे आजार असलेलया नागरिकांची सायंकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये प्राथमिक तपासणी करण्यात आली तदनंतर दि. 7 मे पासून जुने शहर स्थित न्यु जोगळेकर प्लॉट स्थित डॉ.अलामा इकबाल उर्दू प्राथमिक शाळा येथे प्राथमिक आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये सायंकाळी 7 ते 10 वाजे दरम्यान एकुण 105 तसेच आज दि. 8 मे रोजी जवळपास 20 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
या शिबीरामध्ये डॉ.झिशान हुसैन, डॉ.नजर शेख, डॉ. इमरान अहमद, डॉ.दाउद आमीन, डॉ.तस्वीर अहमद, डॉ.ताजिन सईद, डॉ.जुबेर अहमद, डॉ.अमीन ईकबाल, डॉ.मौजदर खान, डॉ.अहमद रजा, डॉ.मुजाहिद हसन, डॉ.इब्राहिम अली, डॉ.मोहम्मद अयाज, डॉ.वासिक अली यांच्या व्दारे तपासणीचे काम करण्यात येत आहेत.
सदर तपासणी करिता मौलवी नदीम कासमी व मौलवी आसिफ रजा साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच यावेळी नगरसेवक मो.मुस्तफा तसेच सामाजिक कार्यकर्ता मो.फजलू पहेलवान, अफसर कुरैशी, शाळाचे मुख्याद्यापक अकिुर्रहमान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हाफीस हमीद, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, राजेंद्र टापरे व पश्चिम झोन कार्यालयातील कर्मचा-यांचा समावेष होता.
अकोला शहरातील सर्व नागरिकांना मनपा प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात येत आहे कि, अकोला शहरामध्ये कोरोना विषणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपणकडे जर कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती असल्यास त्वरीत अकोला महानगरपालिकेच्या टोल फ्री क्रमांक व हेल्पलाईन नंबर 18002335733, 0724-2434412, 0724-2423290, 0724-2434414, 0724-2430084 या नंबरांवर देउन सहकार्य करावे ही विनंती. माहिती देणा-याचे नांव पुर्णपणे गुप्त ठेवण्यात येणार आहे.
अधिक वाचा: बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल!