अकोला (प्रतिनिधी)- अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथे सायंकाळी अकोट रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चोहट्टा बाजार ते अकोट या रस्त्यावर माऊली टायर्स जवळ सायंकाळच्या वेळेस रस्त्याच्या कडेला मृतदेह असल्याची बाब वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी एकच गर्दी जमली यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्राथमिक माहितीनुसार सदर मृतदेह हा दनोरी येथील ५१ वर्षीय इसमाचा असल्याचे प्राथमिक माहिती आहे पुढील तपास दहीहंडा पोलीस करीत आहेत