हिवरखेड ( प्रतिनिधी): आज नाशिक येथे अडकलेल्या युवकाने वाहन उपलब्ध न होऊ शकल्याने आपल्या स्व-गृही परतीसाठी नाशिक ते हिवरखेड या प्रवास सायकलने पाच दिवस प्रवास करीत प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. या युवकासह इतरही बाहेरगावहून आलेल्या युवकाचे आगमन झाल्यानंतर त्याची ग्रामपंचायत व कोरोना मुक्त हिवरखेड समितीने त्याची आरोग्य तपासणी आरोग्यवर्धिनी येथे घेतली. या युवकाचे आरोग्यवर्धिनी येथे पुष्पगुच्छ देऊन गावकऱ्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी हिवरखेड येथील बरेच युवक-युवती शिक्षण व नोकरी निमित्ताने पुण्यात स्थित आहे. परंतु देशात कोरोनाच्या पाश्वभूमीवर बरेचशे कारखाने, कंपनी, शिक्षण बंद आहेत. शासनाच्या आदेशाने कोरोना या विषाणूचा पादुर्भाव होऊ नये या करीता गेल्या दोन महिन्यापासून लोकांनी घरातच राहावे, असा आदेश आहे. त्यामुळे पुणे सह देशातील नागरिकांना बाहेर निघत येणे कठीण झाले होते. सध्यस्थितीत त्यांना अन्नापासून सुद्धा वंचित राहण्यात पाळी येत होती. परंतु महाराष्ट्र शासनाने घरी जाण्यास इच्छुक लोकांना काही कार्यपद्धती व नियम तयार करून तेथील जिल्हाधिकारी यांचे कडून येण्यास परवानगी देण्यासाठी ई- पासेस तयार केल्या आहेत. ई पासेस मिळविण्यासाठी त्यांना आरोग्य तपासणी अनिवार्य आहे. सर्व अटीची पूर्तता केल्यानंतर प्रवासासाठी ई-पास मिळाल्यानंतर एवढ्या दूरवरून प्रवासासाठी सुविधा नसल्याने अडचणी जात आहे. यावर मात करीत हिवरखेड येथील गिऱ्हेनगर मधील सत्यविजय रमेश जऊळकार हा युवक नाशिक येथून सायकलने हिवरखेड ला चक्क सायकलने दाखल झाला. कोविड १९ ची ग्रामपंचायत व कोरोना मुक्त हिवरखेड समिती कडून त्याची व इतर बाहेरगाव येथून आलेल्यांची आरोग्यवर्धिनी येथे डॉ.सौ.ठाकरे यांनी आरोग्य तपासणी करुन त्यांचे हातावर स्टॅम्प लावून त्यांना घरातच काईन्टन राहण्यास सांगीतले. तपासणी केल्यानंतर या युवकाचे ग्रामपचांयतचे ग्रामसेवक भीमराव गरकल, माजी सरपंच सुरेश ओंकारे डॉ.रामदादा तिडके, संवादचे सतीष इंगळे व प्रेस क्लबचे श्यामशील भोपळे व बाळासाहेब नेरकर यांनी स्वागत केले. बाहेरगाव येथून आलेल्यांनी आपली माहिती ग्रामपंचायत प्रशासन यांना देऊन त्यांनी आपली कोविड १९ ची तपासणी करण्याचे आवाहन कोरोना मुक्त हिवरखेड समितीच्या वतीने करण्यात येत आहे.