बोर्डी(देवानंद खिरकर): अकोला वनविभाग अंतर्गत अकोट वर्तुळात येत असलेल्या ग्रामीण भागात लाॅकडाऊन व सचांरबदी लागु असताना सुध्दा बोर्डी परिसरात कुठलिही पर्मिशन नसतांना मोठ्या प्रमाणात जिवंत हिरव्या निंब, निलगीरी,व इतर आड जातीच्या झाडांची अवैध बेसुमार कत्तल सुरू असुन याबाबत वनविभागाला माहिती असुन सुद्धा रान कसायाना रान मोकळे करून दिल्याने अकोट ग्रामीण भागात बेसुमार झाडांची अंधाधुंद अवैधरित्या कत्तल सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.अकोट ग्रामीण भागात यामध्ये प्रामुख्याने हिरव्यागार निबांच्या व आडजात जिवंत झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होताना दिसत आहे. याबाबत अकोला वनविभागांच्या अकोट व अकोला येथील अधिकाऱ्यांना मोबाईल वरुन माहिती व वाॅटसअप वर फोटो व्हीडीओ निसर्ग प्रेमी माहिती देत असतात पण यामध्ये कुठलीही कडक कारवाई करण्यात येत नसल्यामुळे वनविभागांची विश्वासार्हता कमी होऊन जनमाणसात वनविभागांच्या अभयामुळे रान कसायाचे मनोबल वाढल्याची चर्चा आहे.